મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai News : निसर्गाचा सन्मान ठेवा अमिताभ बच्चन यांची ब्लॉगवरून प्रतिक्रिया

Mumbai News मुंबई - नेपाळमध्ये ग्लेशियर फुटल्यामुळे खूप मोठा पूर आला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

Mumbai News : निसर्गाचा सन्मान ठेवा अमिताभ बच्चन यांची ब्लॉगवरून प्रतिक्रिया

Mumbai News मुंबई - नेपाळमध्ये ग्लेशियर फुटल्यामुळे खूप मोठा पूर आला. या पुरामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. नेपाळमधील काही भागांना चांगलाच फटका बसला. पुरानंतर अनेक लोक बेपत्ता असल्याचे समोर आल्या आहेत. नेपाळमधील पुरानंतर मनोरंजन विश्र्वातील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लॉगवरून या पुराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अमिताभ बच्चन काय म्हणतातhttps://maharashtramirror.com/ Mumbai News
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नेपाळमधील पुराबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात एक गंभीर विषय, नेपाळमध्ये पुरामुळे झालेली हानी पाहणं अत्यंत वेदनादायी आहे. निसर्गाने केलेल्या कोपाशी कधीही लढता येत नाही. आपण निसर्गाचा सन्मान केला पाहिजे. यासाठी परमेश्र्वराची उपस्थिती आवश्यक आहे. आपण सर्वांसाठी प्राथर्ना करू या. https://maharashtramirror.com/ Mumbai News

શેર કરો