મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Delhi news : अमित शाहांच्या भेटीने राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; अर्थखात्यासाठी जोरदार प्रयत्न? माजी मंत्र्याच्या कमबॅकचीही चर्चा

Delhi news :नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

अमित शाहांच्या भेटीने राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; अर्थखात्यासाठी जोरदार प्रयत्न? माजी मंत्र्याच्या कमबॅकचीही चर्चा
अमित शाहांच्या भेटीने राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; अर्थखात्यासाठी जोरदार प्रयत्न? माजी मंत्र्याच्या कमबॅकचीही चर्चा

Delhi news :नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीचा एक फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित नसल्याने पक्षांतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.https://maharashtramirror.com/Delhi news

या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील हे नेते दिसत आहेत. मात्र, पक्षाच्या प्रमुख नेतृत्वातील सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीमुळे या भेटीमागील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.https://maharashtramirror.com/Delhi news

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न?


अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या बैठकीचा नेमका अजेंडा अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे अर्थखाते पुन्हा मिळावे, यासाठी ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले होते. आता हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे यावे, यासाठी पक्षातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

दिलीप वळसे पाटील की धनंजय मुंडे? मंत्रिमंडळात कमबॅकची चर्चा

या भेटीच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चाही पुन्हा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी मंत्री दिलीप वळसे पाटील किंवा धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका माजी मंत्र्याचे लवकरच मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत झालेली ही भेट केवळ अर्थखात्यापुरती मर्यादित होती की मंत्रिमंडळातील फेरबदल आणि पक्षांतर्गत राजकीय समीकरणांबाबतही चर्चा झाली, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या भेटीचा अधिकृत तपशील समोर आल्यानंतरच त्यामागील नेमके राजकीय कारण स्पष्ट होणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

हेही वाचा: Pune News : पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; प्रकृती बिघडलेल्या महिला प्रवाशाला तातडीने ससून रुग्णालयात पोहोचविले

શેર કરો