મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Alibag News : जमिनीच्या 7/12 उताऱ्यासाठी लाचखोरी; अलिबागमध्ये तलाठी आणि महसूल सेवक एसीबीच्या जाळ्यात!'

Alibag News :अलिबाग/रायगड :- जमिनीची वर्गवारी बदलून 7/12 फेरफार आणि 8-अ चा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील थळ येथील महसूल अधिकाऱ्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पर्दाफाश केला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

जमिनीच्या 7/12 उताऱ्यासाठी लाचखोरी; अलिबागमध्ये तलाठी आणि महसूल सेवक एसीबीच्या जाळ्यात!'
जमिनीच्या 7/12 उताऱ्यासाठी लाचखोरी; अलिबागमध्ये तलाठी आणि महसूल सेवक एसीबीच्या जाळ्यात!'

Alibag News : रायगड एसीबीचा थळ कार्यालयात धडक सापळा; 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, दोन्ही लाचखोरांना बेड्या'

Alibag News :अलिबाग/रायगड :- जमिनीची वर्गवारी बदलून 7/12 फेरफार आणि 8-अ चा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील थळ येथील महसूल अधिकाऱ्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पर्दाफाश केला आहे. लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी आणि ग्राम महसूल सेवकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी अमृत चंद्रकांत चोगले (वय 52, ग्राम महसूल अधिकारी - वर्ग ३, थळ, ता. अलिबाग) आणि जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय 55, ग्राम महसूल सेवक - वर्ग 4, थळ, ता. अलिबाग) या दोन लोकसेवकांवर गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Alibag News

'7/12 उताऱ्यासाठी मागितली 2 हजारांची लाच'

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील 35 वर्षीय तक्रारदाराची थळ येथे सर्व्हे नं. 45/8/ब मध्ये 0.19.00 हेक्टर एवढी शेतजमीन आहे. ही जमीन 'वर्ग 2' प्रकारात मोडत असल्याने ती 'वर्ग 1' प्रकारात करण्यासाठी तसेच 7/12 फेरफार आणि 8-अ चे उतारे मिळण्यासाठी तक्रारदाराने 30 सप्टेंबर 2026 रोजी थळ ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.https://maharashtramirror.com/ Alibag News

हे उतारे देण्यासाठी ग्राम महसूल सेवक जितेंद्र पाटील याने 5 ऑक्टोबर 2026 रोजी फोनवरून 2,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी 6 ऑक्टोबर 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड-अलिबाग कार्यालयात थेट तक्रार नोंदवली.

'कार्यालयातच लाच स्वीकारली; एसीबीचा धडाकेबाज सापळा'

तक्रार प्राप्त होताच 6 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारीच्या सुमारास एसीबीच्या पथकाने थळ येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात पंचांसमक्ष लाचेची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तलाठी अमृत चोगले व महसूल सेवक जितेंद्र पाटील यांनी तडजोडीअंती 1,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानंतर दुपारीच्या सुमारास एसीबीने कार्यालयात सापळा रचला. तलाठी अमृत चोगले याने तक्रारदाराकडून 1,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वतःच्या कार्यालयीन टेबलावर ठेवण्यास सांगून पंचांसमक्ष ती स्वीकारली. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही दुपारीच्या सुमारास ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

'वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई'

ही धडक कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड युनिटच्या पोलीस उप अधीक्षक सरिता आयप आस भोसले आणि त्यांच्या पथकातील अमोल कचरे, स्वप्ना राऊत व महेश पाटील यांनी पार पाडली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો