Ajit Pawar Accident : अजित पवारांच्या मृत्यूचा तपास की 'व्हीआयपी' पाहुणचार? रोहित पवारांचा सीआयडीवर घणाघाती आरोप; 'त्या' कंपनीच्या मालकाला पोलिसांच्याच गाडीतून पळवल्याचा दावा
Rohit Pawar On VSR Company : व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.
2 મિનિટ વાંચન

Rohit Pawar On VSR Company : व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला सीआयडी कार्यालयात नाश्ता-जेवण आणि क्रिकेटची मॅच? | महाराष्ट्रात साधी एफआयआर का होत नाही? रोहित पवारांचा सवाल | आज नवीन पुराव्यांसह सीआयडी कार्यालयात धडक देणार
मुंबई :- दिवंगत अजित पवार Ajit Pawar Accident यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत तपास यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग हा चौकशीसाठी आला होता की पाहुणचारासाठी? असा बोचरा सवाल करत रोहित पवारांनी सीआयडी कार्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.
सीआयडी कार्यालयात गुन्हेगाराला 'राजाश्रय'?
रोहित पवारांनी काल सीआयडी कार्यालयात झालेल्या चौकशीच्या पद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. "व्ही. के. सिंग हा सकाळी 11.30 वाजता सीआयडी कार्यालयात आला. त्याला पोलिसांच्या बंदुकधारी सुरक्षेत आणण्यात आले होते. तिथे त्याला केवळ नाश्ता आणि जेवणच दिले नाही, तर संध्याकाळी अर्धा तास क्रिकेटची मॅच पाहण्याची सोयही करण्यात आली," असा दावा रोहित पवारांनी केला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, बाहेर मीडिया आणि कार्यकर्ते उभे असताना या मुख्य संशयिताला पोलिसांच्याच काळ्या काचा असलेल्या गाडीतून गुपचूप बाहेर काढण्यात आले. एका गुन्हेगारी कृत्यातील संशयिताला अशी 'व्हीआयपी' ट्रिटमेंट मिळणे हा तपासाचा भाग आहे की दबावाचा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
"महाराष्ट्रात एफआयआर का होत नाही?"
रोहित पवारांनी यावेळी सत्तेत असलेल्या नेत्यांनाही धारेवर धरले. "2019 मध्ये घाटकोपर विमान अपघातावेळी भाजप नेते किरीट सोमय्या गेल्यानंतर लगेच एफआयआर नोंदवण्यात आला होता. मग अजित पवार यांच्या मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र पोलीस एफआयआर का घेत नाहीत?" असा सवाल त्यांनी केला. जे लोक आज सत्तेत आहेत आणि स्वतःला दादांचे जवळचे समजतात, त्यांना साधा गुन्हा दाखल करून घेता येत नाही, ही शरमेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवीन पुरावे घेऊन सीआयडी कार्यालयात धडक
तपास यंत्रणांची दिशाभूल होत असल्याचे पाहून रोहित पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. "माझ्याकडे असलेली नवीन आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊन मी आज संध्याकाळी स्वतः सीआयडी कार्यालयात जाणार आहे. एएआयबीचा (AAIB) अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. आता वेळ आली आहे, आज मी एफआयआरची स्पष्ट मागणी करणार आहे," असे रोहित पवारांनी ठामपणे सांगितले.
