મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासदत्व नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विशेष सवलत

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सर्व सभासदांसाठी नूतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासदत्व नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विशेष सवलत
प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासदत्व नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विशेष सवलत

Pune News : प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासदत्व नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विशेष सवलत

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सर्व सभासदांसाठी नूतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या सभासदत्व नूतनीकरणाची मुदत संपलेल्या सभासदांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत केवळ ३०० रुपयांत सभासदत्व नूतनीकरण करण्याची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News मंडळामार्फत नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यास झालेल्या विलंबामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसार, नूतनीकरणाच्या देय तारखेपासून ९० दिवसांचा वाढीव कालावधी (ग्रेस पीरियड) दिला जातो. या काळात नूतनीकरण न केल्यास संबंधित सदस्याचे सभासदत्व समाप्त होते आणि त्यांना ८०० रुपये भरून नवीन नोंदणी करावी लागते. मात्र, या विशेष सवलतीमुळे ज्या सभासदांचा नूतनीकरण व वाढीव कालावधी संपला आहे, ते आगामी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ३०० रुपये भरून आपले नूतनीकरण करू शकतील. १ जानेवारी २०२७ पासून मात्र नियमानुसार नवीन नोंदणीसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाईल. त्यामुळे पात्र सदस्यांनी https://ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો