મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : अखेर कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : कृषी विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि तत्कालीन दक्षता पथकाचे तंत्र अधिकारी किरण श्यामराव जाधव तसेच त्यांच्या पत्नीवर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची (१२८ टक्के) अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीब

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

अखेर कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल
अखेर कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल

Pune News : जाधव यांच्या पत्नीही सहआरोपी; चौकशीत ४.३७ कोटींची अघोषित मालमत्ता उघड

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : कृषी विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि तत्कालीन दक्षता पथकाचे तंत्र अधिकारी किरण श्यामराव जाधव तसेच त्यांच्या पत्नीवर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची (१२८ टक्के) अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अखेर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे कृषी वर्तुळात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मिळालेल्या माहितीनुसार, किरण श्यामराव जाधव आणि त्यांच्या पत्नी संगीता किरण जाधव (दोघे रा. कुंदन पार्क, शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. किरण जाधव हे सध्या सोलापूर येथे 'आत्मा' (ATMA) योजनेचे प्रकल्प संचालक तथा उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

कृषी विभागातील विविध परवान्यांचे वाटप आणि खते व बियाणे विभागातील आर्थिक गैरव्यवहारावरून राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एप्रिल २०२५ मध्ये कृषी विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्रशासकीय स्तरावर झालेल्या या आरोपांची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी २ डिसेंबर २०२५ रोजी किरण जाधव यांची 'उघड चौकशी' करण्याचे आदेश दिले होते.

असा झाला अवैध संपत्तीचा पर्दाफाश
एसीबीच्या पथकाने किरण जाधव यांच्या सेवाप्रवेशापासून म्हणजेच ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या तब्बल ३१ वर्षांच्या प्रदीर्घ परीक्षण कालावधीतील त्यांच्या उत्पन्नाची, स्थावर व जंगम मालमत्तेची सखोल छाननी केली. या कायदेशीर चौकशीदरम्यान जाधव दांपत्याचे वैध उत्पन्न, दैनिक खर्च, कौटुंबिक गुंतवणूक आणि प्रत्यक्ष मालमत्ता यांचा ताळेबंद मांडण्यात आला.
तपासणीअंती, जाधव यांनी आपल्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत १२८ टक्के अधिक म्हणजेच ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने अर्जित केल्याचे निष्पन्न झाले. ही अपसंपदा बाळगण्यास आणि बेकायदेशीर मालमत्ता जमवण्यास पत्नी संगीता जाधव यांनी प्रोत्साहन व सहकार्य दिल्याचे निष्पन्न झाल्याने, एसीबीने दोघांनाही या प्रकरणात आरोपी केले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी स्वत: बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले करत आहेत.

कारवाईची व्याप्ती वाढणार
जाधव यांनी कृषी विभागात तंत्र अधिकारी (खते) आणि दक्षता पथकात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. या काळात झालेल्या गैरव्यवहारांची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, एसीबी आता त्यांच्या स्थावर मालमत्ता, बँक खाती, बेनामी गुंतवणूक आणि विविध ठिकाणच्या घरांची व जमिनींची झडती घेण्याची शक्यता आहे.
या कारवाईमुळे शासकीय सेवेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો