Delhi News : आपच्या देणग्यांना मोठी ओहोटी; वर्षभरात ६८ टक्क्यांची घट
Delhi News : नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे.
2 મિનિટ વાંચન

Delhi News : २०२५-२६ मध्ये पक्षाला मिळाले १२.१० कोटी; दोन कंपन्या आणि प्रुडंट ट्रस्टकडून प्रत्येकी ५ कोटी
Delhi News : नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे. पक्षाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात १२.१० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम तब्बल ६८ टक्क्यांनी कमी आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
‘आप’च्या देणगी अहवालानुसार, पक्षाला मिळालेल्या मोठ्या देणग्यांमध्ये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट, ट्रायडेंट लिमिटेड आणि राजिंदर गुप्ता यांच्या कंपन्यांकडून प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा समावेश आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
गुप्ता हे ‘आप’चे माजी खासदार असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये ‘आप’च्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले होते. ट्रायडेंटकडून देण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या देणगीचा चेक ९ जानेवारी २०२६ रोजीचा आहे. त्यावेळी गुप्ता ‘आप’मध्ये होते. त्यानंतर याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
रांकांकडून २१ हजारांची देणगी
‘आप’च्या देणगीदारांच्या यादीत कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सह-संयोजक आशुतोष रांका यांचेही नाव आहे. त्यांनी ‘आप’ला २१ हजार १०० रुपयांची देणगी दिली आहे. ही देणगी २०२५-२६ या कालावधीत देण्यात आली होती. विशेष म्हणजे, रांका हे त्यावेळी सीजेपीमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यांनी यापूर्वी ‘आप’चे प्रवक्ते म्हणून काम केले आहे.
मागील वर्षी ३८.१० कोटींच्या देणग्या
‘आप’ने २०२४-२५ मध्ये ३८.१० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे जाहीर केले होते. २०२३-२४ मध्ये पक्षाला मिळालेल्या ११.०६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम तिपटीहून अधिक होती. २०२४-२५ मध्ये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट हा पक्षाचा सर्वात मोठा देणगीदार ठरला होता. ट्रस्टकडून त्यावेळी १६.४० कोटी रुपये मिळाले होते.
पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा प्रत्येकी १० हजार रुपयांची देणगी दिली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी प्रत्येकी ३,५०० रुपयांचे १२ हप्ते भरले असून, त्यांची एकूण देणगी ४२ हजार रुपये आहे. पंजाब ‘आप’चे अध्यक्ष अमन अरोरा यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांचे १२ हप्ते भरले असून, त्यांची एकूण देणगी १.२० लाख रुपये आहे.
टीडीपी, वायएसआर काँग्रेसच्या देणग्यांतही घट
आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) २०२५-२६ मध्ये ५८.२५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षी पक्षाला ८३.०३ कोटी रुपये मिळाले होते.
टीडीपीकडून सत्ता गमावलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने २०२५-२६ मध्ये २४.३१ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे कळवले आहे. २०२४-२५ मध्ये पक्षाला सुमारे १४०.०४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.
दरम्यान, २०२४ मध्ये ओडिशातील सत्ता गमावलेल्या बिजू जनता दलाने (बीजेडी) आपल्या ताज्या अहवालात २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची कोणतीही देणगी नोंदवलेली नाही. पक्षाने २०२४-२५ मध्ये ६० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे जाहीर केले होते. त्यातील संपूर्ण रक्कम एप्रिल आणि मे २०२४मध्ये, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी मिळाली होती.
