મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Corporation PMPMLपीएमपीएमएलच्या कारभारावर महापालिकेत खास सभा होणार

पुणे, महाराष्ट्र मिरर Pune Corporation PMPML : पीएमपीएमएलच्या कारभारावर चर्चा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून येत्या सोमवारी ( दि.२० ) रोजी खास सभा बोलविण्यात आली आहे.

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

Pune Corporation PMPMLपीएमपीएमएलच्या कारभारावर महापालिकेत खास सभा होणार

पुणे, महाराष्ट्र मिरर Pune Corporation PMPML : पीएमपीएमएलच्या कारभारावर चर्चा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून येत्या सोमवारी ( दि.२० ) रोजी खास सभा बोलविण्यात आली आहे. Pune Corporation PMPML

पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीमधील सभागृहात ही खास सभा होणार आहे. दरम्यान, या सभेत पीएमपीएमएल आर्थिक कारभारासह संकलित तुटीच्या भरपाईचा विषय महापालिकेच्या या खास सभेत चर्चेला येणार आहे. या सभेत पीएमपीएमएलच्या सन २०२५-२६ मधील संकलित तुटीसाठी महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या ४७४ कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

पीएमपीएमएलने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ८०८.२६ कोटी रुपयांची संकलित तूट दाखविली असून, त्यापैकी महापालिकेचा ६० टक्के हिस्सा ४८४.९६ कोटी रुपये आहे. यापैकी यापूर्वी १० कोटी रुपये आगाऊ देण्यात आले असून, ९४.९९ लाख रुपयांची मिळकतकर थकबाकी समायोजित करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित ४७४.०१ कोटी रुपये एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत दरमहा ३९.५० कोटी रुपयांच्या बारा समान हप्त्यांत पीएमपीएमएलला देण्याचा प्रस्ताव आहे.Pune Corporation PMPML

नगरसेवक आक्रमक

पुणे महापालिकेच्या निवडणूका जानेवारी २०२६ मध्ये झाल्यानंतर मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या नियमित मुख्य सभांमध्ये नगरसेवकांकडून पीएमपीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत याबाबत खास सभा घेण्याची मागणी केली होती. तसेच, या सभांसाठी लेखी प्रश्नही उपस्थित केले. नगरसेवकांकडून पीएमपीएमएलच्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत विविध प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Pune Corporation PMPML

શેર કરો