पाटील इस्टेट पासून संचेती हॉस्पिटलकडे जाणारा बंद रस्ता सुरु करावा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पदाधिकारी अॅड.
1 મિનિટ વાંચન

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पदाधिकारी अॅड. स्वप्निल जोशी यांची मागणी
निलेश राऊत
पुणे: पाटील इस्टेट पासून संचेती हॉस्पिटल कडे जाणारा रस्ता हा गेल्या काही दिवसांपासून बंद केलेला आहे. सदर रस्ता हा पाटील इस्टेट, महात्मा गांधी वसाहतीतील स्थानिक लोकांना रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यामुळेच पाटील इस्टेट व महात्मा गांधी या वस्त्या शहाराच्या मध्य भागाला जोडल्या जातात. हा रस्ता बंद झाल्यास किंवा एकेरी केल्यास स्थानिक लोकांना खूप लांबून वळसा घेऊन मध्य भागात जावे लागेल त्यामुळे त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे सदर रस्ता लवकरात लवकर सुरु करून स्थानिक रहिवाशांना दिलासा द्यावा, असे निवेदन प्रमोद दोरकर (पोलीस सहाय्यक निरीक्षक वाहतूक विभाग) यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड.स्वप्निल मारुती जोशी यांनी दिले. तसेच सदर विषयावर अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली. याचबरोबर लवकरात लवकर हा रस्ता पूर्ववत सुरु करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
A closed road leading from Patil Estate to Sancheti Hospital should be started.
