મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

चिंचवड येथे फॅन्सी नंबरची कार बिनदिक्कत फिरते

शहरात अनेक वाहने विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असलेली आहेत

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

चिंचवड येथे फॅन्सी नंबरची कार बिनदिक्कत फिरते

शहरात अनेक वाहने विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असलेली आहेत

पिंपरी: नोंदणी क्रमांक पूर्ण दिसणार नाही अशा पद्धतीने केवळ शेवटचे चार अंक असलेली फॅन्सी नंबरची कार वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे बिनदिक्कत फिरत असताना आढळून आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वाहने विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, फिल्मी अशा पद्धतीने फिरताना दिसून येतात. मात्र अशा लोकांवर कारवाई होण्याचे प्रमाण कमी असून सामान्य नागरिकांकडून आता अशा धनधाडंग्यांच्या वाहनांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

શેર કરો