મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पालिकेला सात गावांच्या एसटीपीसाठी ७१० कोटी

'अर्बन चॅलेंज फंडा'तून मिळणार निधी; स्थायीचे अध्यक्ष भिमाले यांची माहिती

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

पालिकेला सात गावांच्या एसटीपीसाठी ७१० कोटी

'अर्बन चॅलेंज फंडा'तून मिळणार निधी; स्थायीचे अध्यक्ष भिमाले यांची माहिती

निलेश राऊत

पुणे: पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोली, मांजरी, हंडेवाडी औताडेवाडी, शेवाळवाडी, बावधन, वडाचीवाडी आणि होळकरवाडी अशा सात गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहर आणि उपनगरांतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंडातून पुणे महापालिकेला ७१० कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसांत मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि रस्ते या क्षेत्रांसाठी या निधीतून मदत मिळणार असून राज्य सरकारने सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. या निधीतून पुणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या शहरांनी आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यात पुणे महापालिकेने ३ हजार कोटींची मागणी केली होती.

पुणे महापालिका हद्दीतील वाहणारे पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी या निधीची मागणी करण्यात आली होती. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली सुमारे ३५० कोटी रुपयांची कामे यापुढेही सुरू राहणार आहेत. तसेच, आतापर्यंत १ हजार २९० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून येत्या काही दिवसांत आणखी ७१० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पुढील टप्प्यात पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून त्यातून रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. या विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा निधी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. या निधीच्या मदतीने वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उभारण्यास गती मिळेल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

710 crores for STP of seven villages to the municipality

શેર કરો