મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : २५० किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद; १ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मधून गांजाची वाहतूक; शिरूरमध्ये दोघांना पकडले

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

२५० किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद
१ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : तब्बल २५० किलो गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-२ने जेरबंद केले. या कारवाईत गांजा, महिंद्रा एक्सयूव्ही ७०० कार आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, दोघेही रा. चांदूर रेल्वे परिसर, जि. अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

२५ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक जीवन माने हे पथकासह लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कुंजीर परिसरात पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयूव्ही ७०० कार वेगाने येताना दिसली. पोलिसांनी हाताने इशारा करून कार थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता सोलापूरच्या दिशेने वेगाने पळवले. कारमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. संशयित कार यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्यानंतर पोलिसांनी यवत पोलिसांची मदत घेतली. कार पुढे शिरूरच्या दिशेने गेल्याने पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाला माहिती देऊन अतिरिक्त पोलीस मदत मागवली.

पोलिसांनी शिरूर शहरात कारचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या दोन संशयितांचा शोध घेण्यात आला. सत्यभामा निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेत, स्टेट बँक कॉलनी, दत्त मंदिराजवळ, शिरूर येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे समीर पुरुषोत्तम राऊत आणि अजय जगदीश मोहिते अशी सांगितली. त्यानंतर संशयित कारची तपासणी केली असता त्यामध्ये २५० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, महिंद्रा एक्सयूव्ही ७०० कार आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) तथा गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार असलेले संजय पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक तसेच पोलीस अंमलदार योगेश कुंभार, शरद धांडे, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, योगेश मांढरे, सुहास धायगुडे, अख्तर शेख, अजिंक्य जोजारे, दिनेश बास्टेवाड, महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे, जान्हवी सूर्यवंशी आणि सुकेशिनी आंबले यांनी ही कारवाई केली. यवत आणि शिरूर पोलीस ठाण्यांच्या पथकांनीही कारवाईत मदत केली.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper