મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

हृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला

एमआयटी डब्ल्यूपीयूत ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

हृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन सवयी बदला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचा सल्ला
एमआयटी डब्ल्यूपीयूत ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

पुणे : "आधुनिक धावपळीच्या युगात हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन या गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही हृदयविकाराचा धोका वाढत असल्याने दैनंदिन सवयींमध्ये बदल करणे लाभदायक ठरेल." असा सल्ला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी दिला.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना 'गर्भापासून ते चितेपर्यंत - हृदयविकाराचा झटका टाळा' या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ऑनलाईन उपस्थित होते. तसेच प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, डॉ. अश्विन कुचेकर, डॉ. शमी शेख आणि डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविराजा एन. सिथाराम यांची विशेष उपस्थिती होती.

एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सांगितले की, आहारातील बदलांमध्ये पोषक घटकांचा समावेश करावा. यामध्ये कच्चा भाजीपाला, कडधान्ये, सुका मेवा यांचा समावेश करावा. बाहेरचे तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरेचे प्रमाण कमी करावे. फॅट्समुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याचा धोका अधिक वाढतो. शारीरिक हालचाल आणि व्यायामामध्ये दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा. सतत बसून राहणे टाळावे. मानसिक आरोग्य आणि झोप अत्यंत महत्त्वाची आहे. व्यसनापासून दूर राहावे. यामध्ये धूम्रपान व मद्यपान टाळावे. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. तसेच नियमित आरोग्य तपासणी करावी. त्यानंतर सकाळच्या सत्रात प्रा. अमृता कुलकर्णी यांनी 'पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्' आणि डॉ. आनंद बापट यांनी 'एथिक्स, प्रिन्सिपल अँड लिडरशीप' या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. संदीप डिकले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper