મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

हर्षदा फरांदे यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी सौ. हर्षदा फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

हर्षदा फरांदे यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी सौ. हर्षदा फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी सौ. हर्षदा फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, "पक्ष संघटनेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी, समाजातील मुलींच्या शिक्षण व प्रगतीसाठी तसेच महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. महिलांना सक्षम बनविणे, त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देणे आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे याला माझे प्राधान्य राहील. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत महिला व मुलींच्या प्रगतीसाठी कार्यरत राहीन."

तसेच, माझ्यासारख्या महिला कार्यकर्तीला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी देऊन महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन दिल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून ओबीसी समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष धरमपाल मौर्य, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी सोपविली आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहीन, असा विश्वास हर्षदा फरांदे यांनी व्यक्त केला.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper