મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

हडपसरमध्ये जुन्या भांडणातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला

माळवाडीत मध्यरात्री राडा; चारचाकी वाहनाचीही तोडफोड, एका महिलेला अटक

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

हडपसरमध्ये जुन्या भांडणातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला
माळवाडीत मध्यरात्री राडा; चारचाकी वाहनाचीही तोडफोड, एका महिलेला अटक

पुणे, महाराष्ट्र मिरर : हडपसरमधील माळवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. यावेळी तरुणाच्या पत्नीच्या डोळ्यांत मिरचीची चटणी टाकून धमकी देण्यात आली. तसेच तरुणाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून अन्य पाच पुरुष आणि एका महिलेचा शोध सुरू आहे.

ही घटना २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेएकच्या सुमारास भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर येथे घडली. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती विनोद कदम (वय ३७, रा. भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर) हिला अटक करण्यात आली आहे. अन्य पाच पुरुष आणि एका महिलेवर गुन्हा दाखल असून त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्राला संबंधित ठिकाणी सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केले. यावेळी आरोपी महिलांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांत मिरचीची चटणी टाकली. तसेच त्यांना धमकी दिली. आरोपींनी फिर्यादी यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करून नुकसान केले.महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोलेवाड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper