स्वारगेट पोलिस ठाण्याशेजारीच मोबाईल हिसकावला
बसची वाट पाहणाऱ्या तरुणाचा ९५ हजारांचा फोन लंपास; दुचाकीवरील दोघे पसार; खडक पोलिसांत गुन्हा
1 મિનિટ વાંચન

पुणे : स्वारगेट पोलिस ठाण्याशेजारील पीएमपी बसथांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या एका २९ वर्षीय तरुणाच्या हातातील ९५ हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेला. ११ नोव्हेंबरला पहाटे पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथे राहणारा हा तरुण पहाटे बसथांब्यावर बसची वाट पाहत होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेले दोघे त्याच्याजवळ आले आणि त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेले.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार शिंदे तपास करत आहेत.
