મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

स्मृती इराणी पुन्हा चर्चेत; स्क्रीन एक्स्प्रेसो कार्यक्रमातून उलगडला जीवनप्रवास

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

स्मृती इराणी पुन्हा चर्चेत
स्क्रीन एक्स्प्रेसो कार्यक्रमातून उलगडला जीवनप्रवास

लखनऊ : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लखनऊ येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या स्क्रीन एक्स्प्रेसो कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेत आपल्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनप्रवासातील विविध पैलूंवर संवाद साधला. १७ नोव्हेंबर रोजी लखनऊ येथील ताज पॅलेस येथे हा कार्यक्रम पार पडला. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रसारण करण्यात आले.

स्मृती इराणी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मनोरंजन क्षेत्रातून केली. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेतील तुलसी विरानी या भूमिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. त्यानंतर २००३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. २०१९ मध्ये त्यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. केंद्र सरकारमध्ये त्यांनी मनुष्यबळ विकास, वस्त्रोद्योग, माहिती आणि प्रसारण तसेच महिला व बालविकास यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना अमेठी मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले.

कार्यक्रमातील संवादादरम्यान त्यांनी दिल्लीतील बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. वडिलांसोबत झालेल्या एका संवादाचा उल्लेख करत त्यांनी त्याच रस्त्यावर स्वतःचे घर असावे, हे बालपणीचे स्वप्न वयाच्या पन्नाशीत पूर्ण झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमात स्मृती इराणी यांच्यासोबत प्रख्यात एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. अम्ब्रिश मित्तल यांचाही सहभाग होता. विविध क्षेत्रांतील अनुभव, संघर्ष आणि यशस्वी प्रवासावर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper