મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

वाकडमध्ये जुन्या वादातून पती-पत्नीला मारहाण करत महिलेचा विनयभंग

चार आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

वाकडमध्ये जुन्या वादातून पती-पत्नीला मारहाण करत महिलेचा विनयभंग
चार आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मिळून एका व्यक्तीला व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथील ऑस्टीन कॉन्टीस सोसायटीत घडली.

याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप ढेंगळे (३५, ताथवडे) आणि त्याच्या इतर तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरातील कचरा टाकण्यासाठी बाहेर विंगमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी बाहेरून त्यांचे पती सुमीत यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. फिर्यादी बाहेर गेल्या असता, प्रदीप ढेंगळे आणि त्याचे तीन साथीदार जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्या पतीला शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण करत होते. फिर्यादी पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्या अंगातील कुर्तीला धरून खाली पाडले आणि केसाला धरून डोक्यात बुक्क्या मारल्या. तसेच इतर साथीदारांनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि मातीने भरलेली प्लॅस्टिकची कुंडी फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. या प्रकरणी वाकड पोलीस तपास करत आहेत.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper