મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का; धीरज देशमुखांच्या सहकार पॅनलची बाजी

काँग्रेसप्रणित सहकार पॅनल विजयी; धीरज देशमुख यांच्यासह १० उमेदवारांचा विजय, संभाजीराव निलंगेकर यांच्या परिवर्तन पॅनलला पाच जागांवर समाधान

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

धीरज देशमुखांच्या सहकार पॅनलची बाजी
धीरज देशमुख आणि संभाजीराव पाटील निलंगेकर

लातूर, महाराष्ट्र मिरर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित सहकार पॅनलने बाजी मारली आहे. आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने १५ पैकी १० जागांवर विजय मिळवत बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या १५ जागांसाठी सहकार आणि परिवर्तन या दोन पॅनलमध्ये थेट लढत झाली. या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार रिंगणात होते. ९९९ मतदारांपैकी ९९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सहकार पॅनलने आघाडी घेतली. अखेर सहकार पॅनलने १० जागा जिंकत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले.

या निवडणुकीत सहकार पॅनलचे प्रमुख आमदार धीरज देशमुख यांनी स्वतःही विजय मिळवला. त्यांनी १३ मतांच्या फरकाने विजय नोंदवला. दुसरीकडे, परिवर्तन पॅनलकडून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजय मिळवला. मात्र, एकूण निकालात परिवर्तन पॅनलला अपेक्षित यश मिळवता आले नाही.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून देशमुख कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीतही सहकार पॅनलने विजय मिळवल्याने बँकेवरील देशमुख कुटुंबीयांची पकड कायम राहिली आहे. विशेष म्हणजे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही धीरज देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा दिला होता. तर महायुतीतील चार आमदारांनी परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते.

मात्र, मतदारांनी सहकार पॅनलच्या बाजूने कौल दिल्याने संभाजीराव पाटील निलंगेकर यांना राजकीय फटका बसला आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही लातूर जिल्हा बँकेचा हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

विजयी उमेदवार

सहकार पॅनल (१० जागा)

- हेमंत जाधव – लातूर

- प्रीती भोसले – उदगीर

- आशिष पाटील राजूरकर – जळकोट

- संतोष पाटील – चाकूर

- धीरज देशमुख

- जगन्नाथ पाटील

- जयेश माने

- सर्जेराव मोरे

- विवेक सिरसाठ

- अविनाश जाधव

परिवर्तन पॅनल (५ जागा)

- अरविंद पाटील निलंगेकर

- अतुल गंभीरे

- भगवानराव पाटील तळेगावकर

- ऋषिकेश कराड

- शोभा पवार

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર