મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीत

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीत
रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे: लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून महाराष्ट्रात आणण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक 'वाघनखे' पुणे येथील शिवप्रेमी आणि नागरिकांना पाहण्यासाठी पुण्यात प्रदर्शनास ठेवावीत, अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांना निवेदन पाठवून ही मागणी लावून धरली आहे.

राज्य शासनाच्या सध्याच्या नियोजनानुसार ही ऐतिहासिक वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, या संपूर्ण वेळापत्रकात पुणे शहराचा समावेश नसल्याने पुणेकरांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीची भावना आहे. या मागणीबाबत बोलताना राहुल डंबाळे म्हणाले की, "पुणे ही स्वराज्याची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा आणि पराक्रमाचा इतिहास या मातीशी जोडलेला आहे. पुण्यात देशभरातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले लाखो तरुण, विद्यार्थी आणि स्थानिक शिवभक्त राहतात. प्रत्येकाला मुंबईला जाऊन ही वाघनखे पाहणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने लंडनच्या संग्रहालयाशी विशेष पाठपुरावा करून पुण्यातही या वाघनखांचे प्रदर्शन भरवावे, जेणेकरून पुणेकरांना आपल्या राजाच्या पराक्रमाचे प्रतीक जवळून पाहता येईल." पुण्यातील सुरक्षित आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन केल्यास लाखो शिवभक्तांना त्याचा लाभ घेता येईल, असेही डंबाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper