मुंबई बुक फेस्टिव्हलसाठी अमित साटम यांचे ठाकरे बंधूंना निमंत्रण; ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ नाटकाच्या प्रयोगासाठी बोलावणे
24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान कलिना कॅम्पसमध्ये महोत्सव; मराठी भाषेच्या 2000 वर्षांच्या इतिहासावरील नाटकाचा 28 नोव्हेंबरला प्रयोग
2 મિનિટ વાંચન

मुंबई :- मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ‘मुंबई बुक फेस्टिव्हल’मधील विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना निमंत्रण दिले आहे. मराठी भाषेच्या इतिहासावर आधारित ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ या नाटकाच्या प्रयोगालाही उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून पोस्ट करत केली आहे.
मराठी भाषेच्या 2000 वर्षांच्या प्रवासाचा वेध घेणारे नाटक; “ज्यांचे मराठीवर प्रेम आहे, त्यांनी इतिहास जाणून घ्यावा”
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबई बुक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये 600 हून अधिक प्रकाशक सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ हे नाटक सादर होणार आहे.
ठाकरे बंधूंना दिलेल्या निमंत्रणावर बोलताना अमित साटम म्हणाले की, “मराठी भाषेचा 2000 वर्षांचा इतिहास सांगणारे हे नाटक आहे. 28 तारखेला प्रक्षेपण आणि प्रयोग होईल. ज्या लोकांचे मराठी भाषेवर प्रेम आहे आणि जे यावर राजकारण करतात, त्यांनी मराठी भाषेचा इतिहास कसा आहे हे जाणून घेण्यासाठी मी निमंत्रण दिले आहे.” मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा प्रवास नव्या पिढीसमोर मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्कवितर्क; भाजप आणि ठाकरे बंधूंतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रणाला महत्त्व; राजकीय संवादाचे संकेत?
भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अलिकडच्या काळात भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये विविध मुद्द्यांवरून तणाव आणि दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या या निमंत्रणाकडे राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या अंगांनी पाहिले जात आहे.दरम्यान, राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसने मिळवलेल्या जागांवर प्रतिक्रिया देताना साटम म्हणाले की, देशभरात विविध निवडणुका होतात आणि त्यानुसार निकाल येतात; पंचायत समितीच्या निवडणुकीत थोडेफार काही हाती लागले, त्याचेच श्रेय घेणे सुरू आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
