મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

मुंढव्यात विवाहितेचा एक लाखांचा मोबाईल हिसकावला

पतीसोबत मोपेडवरून जात असताना दुचाकीवरील दोघांचा डल्ला; आरोपी फरार

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

मुंढव्यात विवाहितेचा एक लाखांचा मोबाईल हिसकावला
पतीसोबत मोपेडवरून जात असताना दुचाकीवरील दोघांचा डल्ला; आरोपी फरार

पुणे, महाराष्ट्र मिरर : पतीसोबत मोपेडवरून जात असलेल्या २३ वर्षीय विवाहितेच्या हातातील एक लाख रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास मुंढवा परिसरात घडली.

याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(८), ३(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत पहाटेच्या सुमारास मोपेडवरून प्रवास करीत होती. त्यावेळी एचपी पेट्रोल पंपाजवळील दी स्मोक पान शॉपच्या रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ येत महिलेच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत एक लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुचाकीवरील दोन्ही अनोळखी आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील करीत आहेत.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper