मीच इथला भाई’; वारजेतील तरुण हातात धारदार हत्यार घेऊन फिरताना अटकेत
पोलिसांना खबर देणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; गणपती माथा परिसरातील घटना
1 મિનિટ વાંચન

पुणे, महाराष्ट्र मिरर : ‘कोण इथला भाई आहे? मी इथला भाई आहे. पोलिसांना खबर देणाऱ्याला मारूनच टाकतो,’ अशी धमकी देत हातात धारदार लोखंडी हत्यार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. राहुल विठ्ठल वांजळे (वय ३१, रा. स्वरा हाईट्स, न्यू अहिरेगाव, वारजे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास वारजे येथील गणपती माथा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल वांजळे हा हातात धारदार लोखंडी हत्यार घेऊन फिरत होता. यावेळी त्याने ‘कोण इथला भाई आहे? मी इथला भाई आहे. पोलिसांना खबर देणाऱ्याला मारूनच टाकतो,’ असे म्हणत धमकी दिली.
सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगून त्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. तसेच पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले.
याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी भोसले यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार व्ही. व्ही. गांगुर्डे करीत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
