મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

भेंडीबाजारातील दाऊदचे जुने घर होणार जमीनदस्त

अखेर महापालिकेकडून करण्यात येणार तोडक कारवाई

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

घर

मुंबई, महाराष्ट्र मिरर : दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील धोकादायक ‘हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना’ इमारतीवर अखेर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे वडिलोपार्जित निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या या ८० वर्षांहून जुन्या इमारतीसह तळमजल्यावरील प्रार्थनास्थळावर कारवाईची तयारी करण्यात आली आहे.

भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीट आणि सेकंड कूपर स्ट्रीटच्या जंक्शनवर ही इमारत आहे. महापालिकेच्या पाहणीत इमारतीचा बहुतांश भाग रिकामा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, तळमजल्यावरील प्रार्थना हॉलचा वापर अद्याप सुरू आहे. त्यामुळे पाडकामादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. प्रार्थना हॉलचा वापर करणाऱ्या नागरिकांना पर्यायी ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. संपूर्ण भेंडीबाजार आणि पाकमोडिया लेन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, महापालिकेचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. आयुक्त अश्विनी भिडे इमारतीच्या पाडकामासह प्रार्थनास्थळावरील कारवाईबाबत प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांशी चर्चा करणार आहेत.

१९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या कटाशी इमारतीचा संबंध

हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही इमारत अंडरवर्ल्डच्या इतिहासातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक मानली जाते. दाऊद इब्राहिम आणि त्याचे वडील इब्राहिम कास्कर यांचे कुटुंब १९८६ मध्ये भारतातून पलायन करण्यापूर्वी याच इमारतीत वास्तव्यास होते. येथे दाऊदचे निवासस्थान आणि कार्यालय होते. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा कट याच ठिकाणाहून रचल्याची नोंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही इमारत दीर्घकाळ सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर राहिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी या इमारतीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पाडकामाची तयारी करण्यात आली; मात्र प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्याने कारवाई थांबली होती. आता कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर महापालिकेच्या ‘सी’ वॉर्ड कार्यालयाने अंतिम नोटीस जारी केली आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર