મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

भरधाव कंटेनरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

अपघातानंतर कंटेनरचालक फरार

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

भरधाव कंटेनरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
अपघातानंतर कंटेनरचालक फरार

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : झेप्टो डिलिव्हरीचे काम करणाऱ्या तरुणाच्या मोटारसायकलला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१४ नोव्हेंबर) रात्री ११:३० च्या सुमारास निगडी ते पुणे जाणाऱ्या ग्रेट सेपरेटर रोडवर बजाज ऑटोसमोर आकुर्डी येथे घडली.

अंकित अशोक मगर (निगडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात अंकितचे वडील अशोक उत्तम मगर (५५) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप उदेशराम कुमार (२८, औरंगाबाद, बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा अंकित हा झेप्टो डिलिव्हरी करण्यासाठी आपली मोटारसायकल घेऊन निगडीकडून पिंपरीकडे चालला होता. बजाज ऑटोसमोर आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर रहदारीकडे दुर्लक्ष करून मागे घेतला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या अंकितच्या मोटारसायकलला कंटेनरची धडक बसली. या भीषण अपघातात अंकितच्या डोक्याला, दोन्ही हातांना व दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला तसेच मोटारसायकलचे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर आरोपीने जखमी तरुणाला कोणतीही वैद्यकीय मदत न देता व घटनास्थळी न थांबता तिथून पळ काढला.निगडी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper