મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पॅसेंजरची वाट पाहणाऱ्या चालकाला मारहाण

आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पॅसेंजरची वाट पाहणाऱ्या चालकाला मारहाण
आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : आळंदी येथील मरकळ रोडवरील घुंडरे पेट्रोल पंपाजवळ एका वाहनचालकाला टोळक्याने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी भगवान विनायक आंधळे (३१, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय संजय लहाने (२०, आळंदी), करण दत्ताराव ढगे (२३, आळंदी), मोन्या उर्फ जय बाबाजी ठुबे (२०, आळंदी) आणि इतर दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे गाडीत सीएनजी भरून प्रवासी मिळण्याची वाट पाहत थांबले होते, तेव्हा आरोपींनी पेट्रोल पंपावरून गाडी काढण्यास सांगितले. कारण विचारल्याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीला गाडीतून ओढून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कंबरेच्या पट्ट्याच्या लोखंडी बक्कलने डोक्यात मारून जखमी केले आणि या परिसरात पुन्हा गाडी घेऊन दिसल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिली. या झटापटीत फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी पडली. या प्रकरणी आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper