મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पुस्तक फाडणे मला मान्य नाही; मंत्री आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला!

पुण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मांडली भूमिका; साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ करणारी असल्याचे मत

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

पुस्तक फाडणे मला मान्य नाही; मंत्री आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला!
पुण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मांडली भूमिका; साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ करणारी असल्याचे मत

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुस्तकातील विचारांशी सहमत किंवा असहमत असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, मतभेद व्यक्त करण्यासाठी पुस्तक फाडणे योग्य नाही. पुस्तक फाडणे मला अजिबात मान्य नाही. मी कधीही पुस्तक फाडलेले नाही, अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉ. विजय चोरमारे लिखित ‘गाथा भारतीय निवडणुकांची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शेलार बोलत होते. यावेळी त्यांनी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करत साहित्यनिर्मिती ही समाजाला प्रगल्भ करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले.

एखाद्या पुस्तकातील विचार काहींना प्रेरणा देणारे, तर काहींना त्रासदायक वाटणारे असू शकतात. पुस्तकातील मांडणीवर आक्षेप घेण्याचा आणि त्याविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, पुस्तक आणि साहित्यनिर्मितीबाबत सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील पाने फाडून निषेध नोंदवला होता. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शेलार यांच्या वक्तव्याकडे शिंदेसेनेवरील अप्रत्यक्ष टीका म्हणून पाहिले जात आहे.

‘पुस्तक फाडणे मला मान्य नाही. मी कधी पुस्तक फाडले नाही किंवा पंतप्रधानांचा निर्णयही फाडलेला नाही,’ असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पुस्तकांवर प्रेम करणारा समाज निर्माण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper