મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पुण्यात २२ नोव्हेंबरला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; ३ लाखांहून अधिक बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट

शहरात १,३६७ लसीकरण केंद्रे उभारणार; सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत लसीकरण

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पल्स पोलिओ

पुणे, महाराष्ट्र मिरर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात रविवारी (दि.२२) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ३ लाख १६ हजार २७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यासाठी पुणे शहरात एकूण १ हजार ३६७ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत या केंद्रांवर बालकांना पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

पोलिओ हा विषाणूमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार असून, पाच वर्षांखालील बालकांना याचा सर्वाधिक धोका असतो. या आजारामुळे हात-पायांना कायमस्वरूपी पक्षाघात होऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनक्रियेवरही परिणाम होऊन बालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पोलिओवर विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्याने लसीकरण हाच या आजारापासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

भारताने पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळवला असला, तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओ विषाणूचे अस्तित्व आहे. त्यामुळे भारतातील पोलिओमुक्त स्थिती कायम राखण्यासाठी प्रत्येक पात्र बालकाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, नियमित लसीकरणामध्ये पोलिओचे डोस घेतलेले असले, तरी या विशेष मोहिमेत पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पुन्हा दोन थेंब देणे गरजेचे आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર