મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात आरटीओची धडक मोहीम; ११ वाहने जप्त

१७० वाहनांची तपासणी; रॅपिडोकडे वैध अॅग्रीगेटर परवाना नसल्याने नागरिकांना अॅप न वापरण्याचे आवाहन

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात आरटीओची धडक मोहीम; ११ वाहने जप्त
१७० वाहनांची तपासणी; रॅपिडोकडे वैध अॅग्रीगेटर परवाना नसल्याने नागरिकांना अॅप न वापरण्याचे आवाहन

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरात विनापरवाना सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. रॅपिडो कंपनीकडून वैध अॅग्रीगेटर परवान्याशिवाय बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरटीओने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मंगळवारी आणि बुधवारी मिळून १७० वाहनांची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ११ वाहने जप्त करून ताब्यात ठेवण्यात आली आहेत.

मे. रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो) या कंपनीकडे पुणे जिल्ह्यासाठी बाईक टॅक्सी चालविण्याचा वैध अॅग्रीगेटर परवाना नसल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परवाना मिळेपर्यंत विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सेवा सुरू ठेवल्याने १६ ऑक्टोबर रोजी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच रॅपिडो अॅप बंद करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. खासगी दुचाकी या अॅपवर नोंदवून प्रवासी वाहतूक केल्यास संबंधित वाहनमालक व चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिला आहे. नागरिकांनी रॅपिडो अॅपचा वापर करू नये, तसेच खासगी दुचाकी मालकांनी आपली वाहने या अॅपवर नोंदवू नयेत, असे आवाहन आरटीओने केले आहे.

कारवाईचा आढावा

तपासणी केलेली वाहने : १७०

कारवाई केलेली वाहने : ३०

जप्त केलेली वाहने : ११

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper