મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पुणे महापालिकेचा दुकानदार, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना दणका; अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे कडक परिपत्रक

दुकानासमोर कचरा आढळल्यास १० हजारांचा दंड; पाचव्यांदा थेट दुकान सील

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

3 મિનિટ વાંચન

पुणे महापालिकेचा दुकानदार, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना दणका
अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे कडक परिपत्रक

पुणे, महाराष्ट्र मिरर : नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय कोणतेही शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही, मात्र केवळ आवाहनावर न थांबता कायदेशीर तरतुदींद्वारे विविध घटकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (मनपा) आता कठोर पाऊल उचलले आहे. शहरातील अस्वच्छता आणि साचलेल्या कचऱ्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कडक कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, फेरीवाले आणि खासगी मोकळ्या जागांमध्ये कचरा आढळल्यास १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार असून, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर पाचव्यांदा थेट सील ठोकण्याची कारवाई केली जाईल.

केंद्र शासनाचे घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०१६ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम २४४ व ३७६ अंतर्गत ही दंडात्मक मोहीम राबवली जाणार आहे.

खासगी जागामालकांचीही जबाबदारी निश्चित

शहरातील विविध भागांतील खासगी मोकळ्या भूखंडांवर कचरा साचल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. यापुढे अशा मोकळ्या जागांवरील कचऱ्याची जबाबदारी संबंधित जागामालकाची असेल. सहाय्यक आयुक्त नोटीस बजावून जागामालकाला कचरा उचलून जागा स्वच्छ करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देतील आणि जागेभोवती नवीन पत्र्याचे कंपाऊंड उभारणे बंधनकारक राहील

दिलेल्या मुदतीत स्वच्छता न केल्यास महापालिकेकडून मनुष्यबळ व मशिनरी वापरून साफसफाई केली जाईल आणि त्याचा खर्च व दंड जागामालकाकडून वसूल केला जाईल. दंडाची रक्कम न भरल्यास ती कर वसुलीप्रमाणे संबंधित मालकाच्या महापालिकेकडील मिळकत करात समाविष्ट केली जाईल, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतर्फे साफसफाई केलेल्या जागांचे आधीचे व नंतरचे जिओ-टॅग फोटो जतन केले जातील

दुकानदारांवर टप्प्याटप्प्याने दंडात्मक कारवाई

व्यावसायिक दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापनांच्या समोरील बाजू स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मालक किंवा भाडेकरूंची राहील. परिसरात अस्वच्छता आढळल्यास नोटीस देऊन एक दिवसाची मुदत दिली जाईल; मुदतीत स्वच्छता न केल्यास खालीलप्रमाणे दंड आकारला जाईल:

पहिल्या वेळी : १०,००० रुपये दंड

दुसऱ्या वेळी : २०,००० रुपये दंड

तिसऱ्या वेळी : ५०,००० रुपये दंड

चौथ्या वेळी : १,००,००० रुपये दंड

पाचव्या वेळी : संबंधित व्यावसायिक दुकान किंवा आस्थापना थेट सील केली जाईल

फेरीवाल्यांना दोन डस्टबिन बंधनकारक

महापालिका हद्दीतील फेरीवाला झोनमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी आपल्या समोरील जागा स्वच्छ ठेवणे अनिवार्य केले आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी प्रत्येक फेरीवाल्याने दोन डस्टबिन ठेवणे बंधनकारक राहील. अस्वच्छता किंवा डस्टबिन नसल्याचे आढळल्यास पहिल्या चार वेळा अनुक्रमे १० हजार, २० हजार, ५० हजार आणि एक लाख रुपये दंड आकारला जाईल, तर पाचव्यांदा नियम मोडल्यास संबंधित फेरीवाल्याचा परवाना रद्द केला जाईल.

दंडात्मक रक्कम कर वसुलीप्रमाणे वसूल करण्यासाठी संबंधित कर निरीक्षकांनी (एसआय, डीआय) जागामालकांच्या मालमत्तेची माहिती २४ तासांच्या आत क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या धोरणामुळे दुकानदार, हॉटेलचालक आणि फेरीवाल्यांना परिसराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार असून, क्षेत्रीय कार्यालयांची नियमित देखरेख आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरातील अस्वच्छतेला आळा बसण्यास मदत होईल.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper