મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांऐवजी तीन आठवडे करण्यात यावा : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांऐवजी तीन आठवडे करण्यात यावा

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांऐवजी तीन आठवडे करण्यात यावा :  सुधीर मुनगंटीवार
अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर जोर

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांऐवजी तीन आठवडे करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. तसेच, सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याचा आणि इंग्रजांपेक्षाही वाईट असल्याचा संदेश बाहेर जाता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर जोर

विदर्भातील जनतेचे प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक समस्यांना विधिमंडळात पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. त्यामुळे या अधिवेशनाचे कामकाज मर्यादित न ठेवता अधिक दिवस चालवणे आवश्यक असल्याचे मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याऐवजी तीन आठवड्यांचे अधिवेशन आयोजित करावे, अशी त्यांची मागणी होती.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper