મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल कौतुक

अपर मुख्य सचिव (गृह) मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्याकडून नवी मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक कामकाजाचा आढावा

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल कौतुक
अपर मुख्य सचिव (गृह) मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्याकडून नवी मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक कामकाजाचा आढावा

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी नुकतीच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन पोलीस दलाच्या कामकाजाचा आणि अत्याधुनिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी एकात्मिक सीसीटीव्ही कमांड सेंटर आणि पुरावा व्यवस्थापन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

दिवाळीपूर्वी झालेल्या या विशेष आढावा बैठकीत पाटणकर-म्हैसकर यांनी गुन्हे तपासात आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी राबवलेल्या तांत्रिक सुधारणांचे विशेष कौतुक केले. प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यापासून ते आरोपपत्र सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर केल्याबद्दल त्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले.

यासोबतच, गुन्ह्यांतील महत्त्वाच्या पुराव्यांचे शास्त्रोक्त आणि सुरक्षित जतन करणाऱ्या 'एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम'चे त्यांनी निरीक्षण केले. नागरिकांशी थेट संवाद साधणारा 'ई-संवाद' उपक्रम आणि महाविद्यालयीन तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या 'कॅम्पस कनेक्ट' या जनजागृती मोहिमेचीही त्यांनी दखल घेतली.

नवी मुंबई पोलिसांनी राबवलेले हे तांत्रिक आणि लोकाभिमुख उपक्रम अत्यंत प्रभावी असून, हे मॉडेल संपूर्ण राज्यभरात राबवण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी काढले. स्मार्ट पोलिसिंगचे उत्तम उदाहरण घालून दिल्याबद्दल त्यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper