મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

नगरसेवकांच्या आंदोलनानंतर आयुक्त थेट एफसी रोडवर; अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून महापालिकेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

नगरसेवकांच्या आंदोलनानंतर आयुक्त थेट एफसी रोडवर
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

पुणे, महाराष्ट्र मिरर : नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून महापालिकेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने मंगळवारी दुपारपासूनच एफसी रोडवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत कारवाईची पाहणी केली आणि अतिक्रमण हटविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एफसी रोडवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा नगरसेवकांनी महापालिकेत उपस्थित केला होता. यावरून सभागृहात गदारोळ निर्माण झाला. नगरसेवकांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत अतिक्रमणविरोधी पथकाला कारवाईचे निर्देश दिले.

त्यानंतर दुपारपासून रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः एफसी रोडवर उपस्थित राहून कारवाईची पाहणी केल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, एफसी रोडवरील अतिक्रमणांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार का आणि महापालिकेची ही कारवाई सातत्याने सुरू राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper