મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

देशासाठी धोनीचे योगदान मोलाचे : इशान किशन

भारतीय क्रिकेटमधील महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आयपीएलमधील खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

देशासाठी धोनीचे योगदान मोलाचे : इशान किशन
भारतीय क्रिकेटमधील महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आयपीएलमधील खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर

पाटणा : भारतीय क्रिकेटमधील महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आयपीएलमधील खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यानेही धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देत त्याच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले आहे. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान आणि युवा खेळाडूंना दिलेली प्रेरणा अतुलनीय असल्याचे किशनने म्हटले आहे.तसेच देशासाठी धोनीचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे इशान किशन म्हणाला

पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना इशान किशन म्हणाला, "धोनीने निवृत्ती घेतली आहे. त्याला हीच योग्य वेळ वाटली असावी. मात्र, त्याने देशासाठी किती मोठे योगदान दिले, तो कसा खेळला आणि त्याने किती युवा खेळाडूंना प्रेरणा दिली, हे आपण समजून घेतले पाहिजे." धोनीच्या निवृत्तीमुळे चाहते आणि खेळाडूंना वाईट वाटले, हे मान्य करतानाच त्याने धोनीच्या कारकिर्दीचा आनंद साजरा करण्याची गरज व्यक्त केली. "त्याने देशासाठी जे काही केले आहे, त्याचा आनंद आहे. कदाचित फार कमी खेळाडूंना असे योगदान देता आले असेल," असेही किशन म्हणाला.

दरम्यान, धोनीने चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. २००८ पासून सुरू झालेला त्याचा आयपीएलमधील प्रवास आता नव्या वळणावर आला असून, आगामी हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे मैदानावरील धोनीची खेळी संपली असली, तरी त्याचे मार्गदर्शन युवा खेळाडूंना मिळत राहणार आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper