મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

दुष्काळाच्या सावटात माणुसकीचा दिवा

दुर्गम प्रतिष्ठानचा उपक्रम ठरला आधार

સક
સ્મિતા કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

दुर्गम प्रतिष्ठान
gifts for adivasi

पुणे : तीव्र दुष्काळाच्या सावटात राजगड किल्ल्याच्या परिसरातील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या देहण, जळकेवाडी, झानेरी आणि मुऱ्हा या दुर्गम गावांतील आदिवासी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानने माणुसकीचा दीप उजळवला. प्रतिष्ठानच्या वतीने ७५ कुटुंबांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आणि कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिनाभर पुरेल इतका किराणा माल, दिवाळी फराळ, ब्लँकेट, कानटोपी, आकाशकंदील, पणत्या, उटणे, रांगोळी अशा सुमारे १०० जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच ४०० वह्या, शालेय साहित्य आणि सौर कंदिलांचे वितरण करण्यात आले. गावातील १३६ महिलांना साड्या, १०९ मुलामुलींना आणि २०० ज्येष्ठ नागरिकांना नवीन कपडे देण्यात आले.

सकाळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते साहित्याचे पूजन करून मदत साहित्याची वाहने रवाना झाली. गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून पुणेकरांचे उत्साहात स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून कार्यक्रमात आपुलकीचा स्नेह जपण्यात आला.

या उपक्रमाला दुर्गम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह आधार ग्रुप, मेडिवन मेडिकल्स आणि दशानेमा भगवती मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला.

શેર કરો