મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

दुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कार

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि बढेकर ग्रुपचा पुढाकार; ग्रामीण भागातील कलाकारांना शहरी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

दुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कार
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि बढेकर ग्रुपचा पुढाकार; ग्रामीण भागातील कलाकारांना शहरी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम

पुणे : ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि दुष्काळग्रस्त लोककलावंतांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र यांच्या वतीने तसेच बढेकर ग्रुप प्रस्तुत ‘अर्बन तमाशा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.अशी माहिती भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश परशुराम परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या परिषदेला चेतन अशोक धोत्रे (अध्यक्ष - सांस्कृतिक विभाग भाजयुमो, पुणे शहर),विनोद वणवे (संकल्पना, दिग्दर्शक - अर्बन तमाशा) उपस्थित होते.

विषयी अधिक माहिती देताना रमेश परदेशी म्हणाले ,ग्रामीण भागातील लोककलावंतांना शहरी रसिकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि दुष्काळग्रस्त कलाकारांना आर्थिक मदतीचा आधार मिळावा, या सामाजिक व सांस्कृतिक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘अर्बन तमाशा’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रतिभावान कलाकार आपल्या गायन, संगीत आणि पारंपरिक लोककलेचा अनोखा आविष्कार सादर करणार आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच लोककलावंतांच्या कलेला प्रतिष्ठा आणि योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश परशुराम परदेशी यांच्या पुढाकारातून करण्यात येत असून, बढेकर ग्रुप या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलाविष्काराचा अनुभव घेण्यासाठी पुणेकर रसिकांना ही विशेष सांस्कृतिक मेजवानी अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाची तिकिटे ‘टिकिट खिडकी’ (Ticket Khidakee) या माध्यमातून उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी ८६०५१ ९०९९१ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

दुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी आयोजित या विशेष सांस्कृतिक उपक्रमाला पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश परशुराम परदेशी यांनी केले आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper