મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

थंडी वाढताच नागपूर संत्र्यांचा हंगाम बहरला; मार्केट यार्डात आवक वाढली

दर्जानुसार ४० ते ७० रुपये किलो दराने विक्री; ग्राहकांकडून चांगली मागणी

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

नागपूर संत्री
नागपूर संत्री

पुणे, महाराष्ट्र मिरर : गोड-आंबट चव, भरपूर रस आणि आकर्षक केशरी-पिवळ्या रंगामुळे ओळखल्या जाणाऱ्या नागपूर संत्र्यांचा हंगाम सध्या बहरला आहे. वाढत्या थंडीमुळे फळांची आवक वाढू लागली असून, गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात नागपूर संत्र्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. दर्जानुसार ४० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने संत्र्यांची विक्री केली जात आहे.

नागपूर संत्र्यांी आवक साधारणतः २० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. सुरुवातीला मर्यादित असलेली आवक आता हंगाम बहरल्याने वाढली आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती परिसरातून संत्र्यांची आवक होत असून, अहिल्यानगर जिल्ह्यातूनही फळे बाजारात दाखल होत आहेत. हा हंगाम डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

संत्र्यांचा रसाळपणा आणि चवीमुळे ग्राहकांकडून या फळांना पसंती मिळत आहे. घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल व्यावसायिक आणि ज्यूस विक्रेत्यांकडूनही संत्र्यांना चांगली मागणी आहे. थंडीच्या दिवसांत संत्र्यांचा वापर वाढत असल्याने आगामी काळातही बाजारातील मागणी कायम राहण्याची अपेक्षा आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર