મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

टोरंट जलविद्युत प्रकल्पाचा फेरविचार करण्याची राष्ट्रवादीची मागणी; सुनील तटकरेंच्या भूमिकेने महायुतीत पेच?

सह्याद्रीच्या संवेदनशील परिसरातील वृक्षतोड आणि जनभावनेचा मुद्दा उपस्थित; विरोधकांच्या आंदोलनानंतर सत्ताधारी गटातूनही सूर

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

टोरंट जलविद्युत प्रकल्पाचा फेरविचार करण्याची राष्ट्रवादीची मागणी; सुनील तटकरेंच्या भूमिकेने महायुतीत पेच?
सह्याद्रीच्या संवेदनशील परिसरातील वृक्षतोड आणि जनभावनेचा मुद्दा उपस्थित; विरोधकांच्या आंदोलनानंतर सत्ताधारी गटातूनही सूर

रायगड :- भीमाशंकरच्या कुशीत आणि कर्जत परिसरात प्रस्तावित असलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आहे. महायुतीतील महत्त्वाच्या घटक पक्षाकडूनच प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी पुढे आल्याने या मुद्द्यावरून सत्ताधारी गटात नवा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पर्यावरणीय संवेदनशीलता आणि जनभावनेचा संदर्भ

माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पासाठी सरकारने विविध परवानग्या मिळवल्या असल्या तरी सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि स्थानिक जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकारने याचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसकडून पाहणी व विरोध; सरकारच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादीचा वेगळा पवित्रा

भीमाशंकरच्या कुशीत आणि कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात होणाऱ्या टोरंट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाविरोधात यापूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. या नेत्यांनी कर्जतमध्ये जाऊन पाहणी केली, स्थानिकांशी संवाद साधला आणि वृक्षतोडीसह जमीन मोजणीच्या मुद्द्यावरून प्रकल्प होऊ न देण्याचा इशारा दिला होता.

दुसरीकडे, प्रकल्प कसा योग्य आहे आणि वृक्षतोडीच्या बदल्यात लाखो झाडे कशी लावली जातील, असे समर्थन सरकारमधील मंत्री करत होते. मात्र, आता महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेसने फेरविचाराची मागणी केल्याने या प्रकल्पावरून राजकीय आणि पर्यावरणीय वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper