મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

एमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा

प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची होणार चौकशी; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आयोगाचा निर्णय

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

एमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा
प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची होणार चौकशी; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आयोगाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नऊ परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांची आणि प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना आपली निवेदने सादर करण्यासाठी आता २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी निवेदने सादर करण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर होती. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी आयोगाने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित परीक्षांमध्ये काही गैरप्रकार घडले असल्यास त्याबाबतची माहिती, पुरावे आणि कागदपत्रे आयोगाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत विहित प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यात सादर करावीत.

निवेदनासोबत स्वतःच्या वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि इतर कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या अधिकृत ई-मेलवरही पाठवावी लागणार आहे.

निवेदन किंवा प्रतिज्ञापत्र सादर करताना काही अडचण आल्यास अथवा अधिक माहिती हवी असल्यास ०२२-२०८६७६७७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. मात्र, २३ नोव्हेंबर २०२६ हीच अंतिम मुदत असून, त्यानंतर आलेली निवेदने किंवा प्रतिज्ञापत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper