મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

एफसी रोडवरील अतिक्रमणधारकांचा माल पार्किंगमध्ये लपवणे ठेकेदाराला भोवले, आयुक्तांची मोठी कारवाई

फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रस्त्यावरील अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पथारीधारकांचा माल जप्तीपासून वाचवण्यासाठी चक्क महापालिकेच्याच पार्किंगमध्ये लपवून ठेवणाऱ्या ठेकेदारावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर कारवाई केली आहे

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

एफसी रोडवरील अतिक्रमणधारकांचा माल पार्किंगमध्ये लपवणे ठेकेदाराला भोवले, आयुक्तांची मोठी कारवाई
फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रस्त्यावरील अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पथारीधारकांचा माल जप्तीपासून वाचवण्यासाठी चक्क महापालिकेच्याच पार्किंगमध्ये लपवून ठेवणाऱ्या ठेकेदारावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर कारवाई केली आहे

पुणे : फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रस्त्यावरील अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पथारीधारकांचा माल जप्तीपासून वाचवण्यासाठी चक्क महापालिकेच्याच पार्किंगमध्ये लपवून ठेवणाऱ्या ठेकेदारावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर कारवाई केली आहे. या गंभीर प्रकाराची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराचा वाहनतळाचा ठेका तत्काळ प्रभावाने रद्द करण्याचे आदेश दिले असून, यापुढे तेथे वाहनधारकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय?

पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत फर्ग्युसन रस्ता येथील मिलेनियम प्लाझा (अंतिम भूखंड क्र. ५७६/२, ५७६/३ व नगर भूमापन क्र. १२१६/२, १२१६/३) येथील वाहनतळाचे व्यवस्थापन व संचलन करण्याचे काम 'मे. पी.बी.पी. एन्टरप्रायजेस' (गुरुवार पेठ, पुणे) यांना देण्यात आले होते. २४ मार्च २०२५ रोजीच्या कार्यादेशानुसार पुढील तीन वर्षांसाठी हा मक्ता देण्यात आला होता.

कारवाईदरम्यान प्रकार उघडकीस

एफसी रोडवरील इमारतींची फ्रंट मार्जिन आणि फूटपाथवरील अतिक्रमणामुळे पादचारी व वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विभागामार्फत १७ नोव्हेंबर रोजी संयुक्त धडक कारवाई हाती घेण्यात आली होती. या कारवाईपासून आपले साहित्य वाचवण्यासाठी काही अतिक्रमणधारक व पथारीवाल्यांनी आपला माल शेजारीच असलेल्या मिलेनियम प्लाझाच्या वाहनतळामध्ये लपवून ठेवला होता.

महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता, ठेकेदारानेच अतिक्रमणधारकांना त्यांचे साहित्य लपवण्यासाठी मदत केल्याचे निदर्शनास आले. वाहनतळाच्या जागेचा वापर पार्किंगव्यतिरिक्त अनधिकृत पथारीधारकांचे साहित्य ठेवण्यासाठी करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. निविदेतील अटी व शर्ती, तसेच करारनाम्यातील अट क्रमांक १५, १८ व २९ यांचा भंग झाल्याचा ठपका ठेवत, मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालयाने ठेका रद्द करण्याचे पत्र जारी केले आहे.

१७ नोव्हेंबरपासून मे. पी.बी.पी. एन्टरप्रायजेस यांचा वाहनतळ चालवण्याचा अधिकार संपुष्टात आला आहे. यापुढे मिलेनियम प्लाझा येथील या वाहनतळावर पार्किंगसाठी कोणत्याही नागरिक किंवा वाहनधारकाकडून शुल्क आकारण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणीही शुल्क मागितल्यास नागरिकांनी त्यास दाद देऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper