મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

आरटीओ चलान भरण्याच्या अॅप्लिकेशनद्वारे ७.२५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

मोबाइलचा अॅक्सेस मिळवून पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्याला घातला डल्ला

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

आरटीओ चलान भरण्याच्या अॅप्लिकेशनद्वारे ७.२५ लाखांची ऑनलाइन फसवणूक
मोबाइलचा अॅक्सेस मिळवून पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्याला घातला डल्ला

पुणे, महाराष्ट्र मिरर : आरटीओ चलान भरण्यासाठी पाठवलेल्या बनावट अॅप्लिकेशनद्वारे मोबाइलचा अॅक्सेस मिळवून सायबर चोरट्यांनी पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यातून तब्बल ७ लाख २५ हजार ७६१ रुपये ऑनलाइन काढून घेतल्याचा प्रकार आंबेगाव परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, फिर्यादींचे गुगल पे किंवा फोन पे यापैकी कोणतेही खाते नसतानाही त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी पैसे काढण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील राजगड सोसायटी येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीला २१ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून सायबर फसवणुकीचा फटका बसला.

अज्ञात व्यक्तीने आरटीओ चलान भरण्यासाठी एक अॅप्लिकेशन पाठवले होते. हे अॅप्लिकेशन मोबाइलमध्ये वापरल्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या संयुक्त बँक खात्यातून वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार करून एकूण ७ लाख २५ हजार ७६१ रुपये काढून घेतले.

आपल्या नावावर गुगल पे किंवा फोन पे खाते नसतानाही बँक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने करीत आहेत.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper