મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

अजित पवारांना अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणलं; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, फडणवीस-अमित शहांवरही निशाणा

‘अजितदादांवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, मग आता त्यांच्याबद्दल इतका उमाळा का?’; अपघाताच्या तपासावरून राऊतांचे सवाल

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. अजित पवार यांना अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणण्यात आले होते, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. अपघातातील संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनीही तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? तपासाची फाईल दाबली जात आहे का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

संजय राऊत म्हणाले की, अजित पवार महायुतीत येण्यापूर्वी त्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यासह विविध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवण्यात आली होती. अटकेच्या धमक्या देऊन त्यांना महायुतीत आणण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. मग आता अजित पवार यांच्याबद्दल इतका उमाळा का येत आहे? असा सवाल करत अमित शहा यांनी यापूर्वी केलेल्या आरोपांबद्दल माफी मागायला हवी होती, असेही राऊत म्हणाले.

विमान कंपनीच्या मालकाच्या संदर्भाचाही राऊत यांनी उल्लेख केला. अजित पवार यांनी वापरलेल्या विमानाच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. रोहित पवार यांनी या प्रकरणातील काही बाबी धाडसाने समोर आणल्या असून, त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासासाठी सीबीआय चौकशीची मागणी करत राऊत यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. या प्रकरणात एफआयआर दाखल करून योग्य पद्धतीने तपास झाला असता, तर संशय निर्माण झाला नसता, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच अजित पवार आणि प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपींवर कारवाई का होत नाही, असा सवाल करत त्यांनी राज्याच्या गृह विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. या आरोपांमुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર