मुंबई

मंत्री गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका

Girish Mahajan Target Sanjay Raut : गिरीश महाजन कडून संजय राऊत यांना ओपन चॅलेंज

मुंबई :- मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांना दिले आहे. संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना पराभूत करण्यासाठीच आम्ही जळगावात उमेदवार दिल्याचे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाला महाजन यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. Girish Mahajan on Sanjay Raut,

मी घर कोंबडा नेता नाही गिरीश महाजन म्हणाले, “संजय राऊत यांना सांगा तुम्हाला माझे चॅलेंज आहे. सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा पाच लाखांच्यावर लीड आणणार. गेल्या वेळीही लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 65 हजाराचे लीड होते. यावेळेस पाच लाखांहून अधिक लीड दिली जाणार, मी तुमच्यासारखा घर कोंबडा नेता नाही. घरात बसून असा आरड ओरड मारत बसत नाही”, असे जोरदार उत्तर महाजन यांनी राऊतांना दिले आहे. Girish Mahajan on Sanjay Raut

राऊतांनी निवडून येऊन दाखवावे पुढे गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “माझी औकात महाराष्ट्राला माहित आहे. तुम्हाला सुद्धा माहित आहे. तुम्ही तुम्हाला सोपी वाटणाऱ्या जागेवर निवडणूक लढवून दाखवा. आमदार, खासदार होऊन दाखवा. मग तुम्हाला तुमच्या औकात कळेल” असे महाजन म्हणाले. Girish Mahajan on Sanjay Raut

एकनाथ खडसे मोठे नेते पुढे महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझा एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध नाही. ते म्हणतात माझी पोहोचवरपर्यंत आहे. दिल्लीत माझा प्रवेश होणार आहे असे त्यांनी सांगितले. ते मोठे नेते आहेत त्यामुळे खालच्या लोकांशी ते बोलत नाहीत”, असा टोला महाजन यांनी लगावला. Girish Mahajan on Sanjay Raut

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0