Gautam Gambhir Quit Politics : दिल्लीचे भाजपाचे खासदार क्रिकेटर गौतम गंभीर यांनी भाजपाचे पक्ष अध्यक्ष यांच्याकडे केली विनंती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मानले आभार
ANI :- माजी क्रिकेटर आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर Gautam Gambhir यांनी भाजपा पक्ष अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे विनंती केली असून ते म्हणाले की मला राजकारणातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानत म्हणाले की त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. Gautam Gambhir Quit Politics
गौतम गंभीर यांचे ट्विट
मी पक्षाचे माननीय अध्यक्ष @JPNadda जी यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान @narendramodi जी आणि माननीय HM @AmitShah जी यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!
क्रिकेटचा राजीनामा घोषित केल्यानंतर गौतम गंभीर राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पार्टी यांचे साथ धरली होती. पक्षाने त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीचे तिकीट दिले आणि ते दिल्ली लोकसभेतून निवडून आले आहेत. परंतु गेले काही दिवसांपासून ते सध्या क्रिकेट क्षेत्रातील कॉमेंट्री चे काम करत आहे त्यांच्या या कामामुळे राजकारणात जनतेची सेवा करण्याकरिता त्यांना अपुरा वेळ मिळत असल्यामुळे त्यांनी राजकारणातून मुक्तता होण्याचा विचार केला आहे.
2011 च्या वर्ल्ड कप मध्ये गौतम गंभीर यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत विजयाचा शिल्पकार ठरले होता. त्यानंतर त्यांनी अनेक क्रिकेट विश्वात वेगळा ठसा उमटवला असून भारत पाकिस्तान सामन्यात ते जबाबदारीपूर्वक नेहमी खेळ करत असे, त्यापूर्वी त्यांनी टी-20 विश्वचषक मालिकेत ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राजकारणात आल्यापासून त्यांनी अनेक समाजसेवक काम केले आहे त्यांचे किचन एक रुपयात जेवण ही त्यांनी चालू केलेले असून दिल्लीतील अनेक गरजू आणि गरीब बेगर लोकांना एक रुपया दिल्लीत जेवण मिळते त्यांचे हे किचन फार लोकप्रिय आहे. Gautam Gambhir Quit Politics