मुंबई
Trending

Gangster Crime News : नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खुन प्रकरणातील गॅंगस्टार अरुण गवळी याच्या साथीदाराला अटक

Arun Gawali Gang Member Arrested : गँगस्टर अरुण गवळी टोळीचा सदस्य व खुनाचे गुन्हयातील जन्मठेप शिक्षा पॅरोल आरोपी यास गुन्हे शाखा, मुंबई कडून अटक “

मुंबई :- गँगस्टर अरुण गवळी Gangster Arun Gawali यांच्या साथीदार असलेला नगरसेवक कमलाकर जामसांडेकर Kamlakar Jamsandekar Murder खुन खटला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई 2008 साली नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खुन झाला होता.या खुनातील आरोपीच्या विरोधात कलम 302, 452, 34 भा. द. वि. सह कलम 3,25 भा.ह.का. सह, कलम 37 (1), 135 मपोका, सह कलम 3(1) (ii), 3(2), 3(4), 3(4) मोक्का कायदा – स्पेशल मोक्का केस क्र. 07/2008 (नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खुन खटला) मध्ये गँगस्टर अरुण गवळी सह इतर 11 आरोपी यांना सत्र न्यायालय, मुंबई यांनी जन्मठेप शिक्षा दिली आहे. सन 2008 पासुन दोषसिद्ध सर्व आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत, नमूद खटल्यातील कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंदी असलेल्या नावे नरेंद्र लालमनी गिरी, (39 वर्ष) हा 11 नोव्हेंबर 2023ते दि. 30 जानेवारी 2024 रोजी पर्यंत पॅरोल (अभिवचन) रजेवर, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून मुक्त होता. तो 30 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात हजर होणे आवश्यक होते. परंतु तो कारागृहात हजर न होता, फरार झाल्याने त्याचे विरुद्ध कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे कलम 224 भा द वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. Arun Gawali Gang Member Arrested

गुन्ह्याचा समांतर तपास कक्ष 03, गुन्हे शाखा, मुंबई यांच्याकडून सुरू असताना, गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा परराज्यात त्याचे वास्तव्याचे ठिकाण वारंवार बदलत असल्याचे समजले. आरोपी 6 मार्च 2024 रोजी रात्री घणसोली, नवी मुंबई येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने, त्याप्रमाणे कक्ष 3 चे पोलीस पथक यांनी घणसोली, नवी मुंबई येथे सापळा लावून, नमूद आरोपी यास 06 मार्च 2024 रोजी 11.30 सुमारास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पुढील कार्यवाही करीता तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई यांचे ताब्यात देण्यात आले आहे. कक्ष -3, गुन्हे शाखा, मुंबई यांनी केलेल्या कामगिरीमुळे गॅगस्टर अरुण गवळी टोळीच्या पॅरोलजंप आरोपीकडून भविष्यात घडणाऱ्या गंभीर अपराधांना प्रतिबंध करण्यात यश आले आहे. Arun Gawali Gang Member Arrested

पोलीस पथक

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) , विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे व सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य) चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष -3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत सिरसाट, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड व महिला पोलीस शिपाई दिपीका ठाकुर यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0