मुंबई
Trending

Gajanan Kale : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आपला पाठिंबा आहे का?…. शिवसेनेला मनसेचे पाच प्रश्न

Gajanan Kale Target Aditya Thackeray On Savarkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका, मनसे कडून पाच प्रश्न विचारण्यात आल

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने आदित्य ठाकरे यांना पाच प्रश्न विचारण्यात आले आहे. या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी द्यावी, अशी मागणी मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केली आहे.

एका मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी मनसेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या मनसेला प्रश्न विचारत आदित्य यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयावर टीका केली होती. त्याला आता मनसेच्या वतीने पाच प्रश्नांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

या संदर्भात गजानन काळे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना हे पाच प्रश्न विचारले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अंधारे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून मनसे विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळत आहे. त्यात आता मनसेच्या वतीने ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. Gajanan Kale Asked Five Question To The MLA Aaditya Thackeray

मनसेला प्रश्न विचारणारे मिस्टर आदित्य यांनी याची पण उत्तरं द्यावीत …

१. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आपला पाठिंबा आहे का?
२. ३७० कलम, राम मंदिर, CAA कायद्यास विरोध करणाऱ्या राहुल गांधींना आपला पाठिंबा आहे का?
३. औरंगजेबाचे जाहीर समर्थन करणाऱ्या अबु आझमी सारख्या औलादी आपल्या महाविकास आघाडीत कशा?
४. वंदनीय बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अक्काला प्रवक्ते पद, नेते पद कसे?
५. मराठीचा पुळका दाखवून मात्र १५० मराठी शिक्षक त्यांचे शालेय माध्यम मराठी असल्यामुळे आपण आपली सत्ता असताना मुंबई मनपात का सामील करुन घेतले नाहीत?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0