क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police News : “सोन्याची बॅग पळवली… पण 12 तासांत मुंबई पोलिसांचा ‘गोल्डन’ पलटवार!”

Mumbai Police Latest News : दिवसा ढवळ्या 3000 ग्रॅम सोनं लंपास – लोअर परळमध्ये धक्कादायक जबरी चोरी

मुंबई | मुंबईच्या मध्यवर्ती लोअर परळ परिसरात घडलेल्या थरारक चोरीने गुरुवारी सकाळी एकच खळबळ उडवली. नागपाडा पोलीस ठाण्याच्या Mumbai Nagpada Police News हद्दीत, एका स्कूटरवरून ऑफिसला निघालेल्या व्यक्तीवर चार अज्ञातांनी हल्ला करून त्याच्या हातातील राखाडी बॅग हिसकावली – ज्यामध्ये होते तब्बल 3000 ग्रॅम वजनाचं सोनं लंपास केले आहे. Mumbai Police Latest News

फिर्यादी व त्यांचा पुतण्या हे लोअर परळ येथील ऑफिसमध्ये जात असताना ही घटना घडली. अज्ञात इसमांनी मारहाण करून 1500 ग्रॅम सोन्याच्या बिस्किटांसह 1500 ग्रॅम वजनाचे तुटलेले रिपेअरिंग दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शहराच्या मध्यवर्ती भागात, दिवसा ढवळ्या झाल्याने पोलीस दलावर मोठा दबाव निर्माण झाला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) व पोलीस उपायुक्त (परिमंडळ 3) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. या पथकांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 12 तासांत पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. त्यांच्याकडून संपूर्ण चोरी गेलेला 3000 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज, ज्याची अंदाजे किंमत 2 कोटी 55 लाख रुपये आहे, हस्तगत करण्यात आला आहे.त्यांच्याकडून संपूर्ण 100% सोनं हस्तगत करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे.

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

पोलीस पथक

पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती ,सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम ,सह आयुक्त (का.सु.) सत्यनारायण ,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे ,अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशीक विभाग) विक्रम देशमाने,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन
पोलीस उप आयुक्त (परीमंडळ-3) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस दलातील विविध पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0