Fir on Rajendra Shilimkar | माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह ४ जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
- रुद्राभिषेक पूजेत जाण्यास रोखले
पुणे, दि. १४ ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : Fir on Rajendra Shilimkar
सातारा रस्त्यावरील शंकरबाबा महाराज मठ येथे रुद्राभिषेक पूजेसाठी आलेल्या चेतन आरडे यांना रोखून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर Rajendra Shilimkar यांच्यासह ४ जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रॉसिटीचा (Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, 1989) गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी चेतन प्रभाकर आरडे हे दि. २० जून रोजी सातारा रस्त्यावरील शंकरबाबा महाराज मठ येथे माजी नगरसेवक महेश वाबळे यांच्या समवेत दर्शनासाठी गेले असता तेथे रुद्राभिषेक पूजा चालू होती. यावेळी फिर्यादी आरडे यांनी पूजेच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर व इतर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी चेतन प्रभाकर आरडे यांनी तक्रार दिल्यावरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुरन. २६८/२०२४ भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम Atrocities Act,, १९८९ ३(१) (r), ३(१) (s), ३(१) (y), अन्वये राजेंद्र यशवंत शिळीमकर, महेश यशवंत शिळीमकर तसेच दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.