क्राईम न्यूज

FIR on Land Mafia | वानवडी : खोटे कागदपत्र तयार करून जागा बळकावल्याप्रकरणी भू माफियांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. २८ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर टीम : FIR on Land Mafia Wanwadi: A case has been registered against the land mafia for grabbing land by creating false documents

आर्थिक फायद्यासाठी कट रचून जागेचे बनावट कागदपत्र तयार करून जागा बळकावल्याप्रकरणी सराईत राज शेख व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथील जेएसपीएम कॉलेज शेजारील १० गुंठ्याचे बनावट कागदपत्र तयार करून जागा बळकावल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. FIR on Land Mafia

राज गुलाब शेख हा सराईत भू माफिया असून त्याने अनेकांना जागेच्या व्यवहारातून गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत जागा मालक विना संघवी यांच्या तर्फे फिर्यादी विजय संघवी यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. FIR on Land Mafia

संशयित आरोपी राज गुलाब शेख, बक्षु भाई, इंतु, अकबरभाई, इम्रान कट्टा व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संघवी यांनी सन २००५ मध्ये राजकुमार कोयाळीकर, चंद्रकांत घुले व इतर यांचेकडून हडपसर सर्वे नं. ५९ हिस्सा नं. १/३/१, १/४/२, १/४/३, १/५/५, १/५/१ व इतर यातील २६.५ गुंठे जागा करारनामा करून दुय्यम निबंधक कार्यालय-३ येथे दस्त क्रं. ६३५३/२००५ करून विना संघवी व पुष्पाबाई परमार यांच्या नावाने नोंदवून घेतली होती. यानंतर सन २०१३ साली सदर मिळकतीबाबत खरेदीखत करण्यात आला होता. खरेदीदस्त नोंदणी झाल्यानंतर फिर्यादी यांच्याकडून सदर जागेवर कंपाउंड करण्यात आले होते. FIR on Land Mafia

यानंतर सदर मिळकतीच्या १० गुंठ्यांवर काही लोकांनी बेकायदा ताबा घेत रहिवास सुरु केला होता. यातील लोकांना फिर्यादी यांच्याकडून विचारणा करण्यात आली असताना त्यांनी सदर जागा राज गुलाब शेख, बक्षु भाई व इतर यांच्याकडून पैसे देऊन दस्तऐवज तयार करून तयार करून घेतली असल्याचे उघडकीस आले होते.

संघवी व परमार यांची जागा बळकावण्यासाठी बेकायदेशीर पत्र्याचे शेड बांधून राज गुलाब शेख, बक्षु भाई, इंतु, अकबरभाई, इम्रान कट्टा यांनी कट रचून बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुरन. १६२/२०२४ भादंवि १२० ब, ३४, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे PSI Santosh Sonwane करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0