Fake Branded Cloths Pune | बनावट ब्रँडेड कपडे विक्रेत्यावर कारवाई : दिवाळीत कापड दुकानदारांची धाकधूक वाढली
Action on fake branded cloths pune
- गुन्हे शाखेची कारवाई, लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- ५ लाखांचे बनावट कपडे जप्त
पुणे, दि. २१ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Fake Branded Cloths Pune | दिवाळीच्या Diwali सणासुदीत बनावट ब्रँडचे कपडे विक्रेत्यांवर पुणे पोलीस गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उचलला आहे. यामुळे बनावट कपडे विक्री करून ग्राहकांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोणीकंद हद्दीतील एका व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली असून तब्बल ५ लाख रुपयांचा बनावट कपड्यांचा माल जप्त करण्यात आला आहे. Fake Branded Cloths Pune
साई ब्रँड होम, केसनंद फाटा, वाघोली पुणे येथे बनावट ब्रँडचे कपडे विक्री केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
दि. २० ऑक्टोबर रोजी एका कंपनीचे प्राधिकृत अधिकारी यांनी याबाबत तक्रार नोंदविली होती. Action on Fake Brand Pune
संशयित विक्रेता गौरव सत्यवान नरवाडे, वय २७ वर्षे, रा. वाघोली, तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या साई ब्रँड होम, केसनंद फाटा, वाघोली पुणे येथे कंपनीचे बनावट कॉपीराईट कपडे विक्री होत असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन कारवाई केली असता कपड्याचे दुकानांमधून व त्याचे गोडाऊन मधून एकूण 4,94,650/- रुपये कि. चा कॉपीराईट केलेला बनावट माल (शर्ट ) जप्त करण्यात आला. सदर बाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नंबर 990/2024 कॉपी राईट ॲक्ट 1957 चे कलम 51,63 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे , पो.उप.आयुक्त गुन्हे, निखील पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त, राजेन्द्र मुळीक , पोलिस निरीक्षक, युनिट ४.अजय वाघमारे , पोलीस निरीक्षक युनिट ६ वाहेद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मदन कांबळे, युनिट ६ पो.उप.नी. दिगंबर चव्हाण युनिट ४ व युनिट ६ व ४ कडील अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे.